महेंद्र महाजनजैन / रिसोड -
शेतकऱ्यानां यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पन्न झाले असतानां शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे जी तुर मागच्या वर्षी १३०००रू क्विंटल दराने विकल्या गेली ती या वर्षी शासनाचा पोरकटपणा व शेतकऱ्याविषयी असणारी असंवेदनशीलता यामुळे शासनाने यावर्षी ५०५० रु तुरीचा हमी भाव देऊन नाफेड मार्फत तुर खरेदी करण्याचे आदेश दिले पंरतु शेतकऱ्याच्या तुरी ऐवजी व्यापाऱ्याची तुर खरेदी करुन नाफेडव्दारे तुर खरेदी बंदचे आदेश दिले.तरी येत्या आठ दिवसात जर संपुर्ण शेतकऱ्यांची तुर खरेदी करुन घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसिलदार यांना दामुआण्णा इंगोले जिल्हा अध्यक्ष, प्रदिप पाटील मोरे उपाध्यक्ष यांच्या नेतुत्वात रिसोड तालुका अध्यक्ष गजानन देशमुख,ता.उपाध्यक्ष तान्हाजी बिल्लारी,प्रमोद बिल्लारी,रामेश्वर सरकटे,सतिष सरकटे,गोरख बोरकर,गजानन शिंदे,अमोल मोरे,गणेश बोरकर,प्रभाकर नाईकवाडे,राम खापे,गणेश वाघमारे,नशीर पठाण, विठ्ठल बिल्लारी, काशिनाथ मोरे,प्रमोद मोरे,रामप्रभु सरकटे,आदित्य वानखेडे,आकाश टाले,संतोष वाहेकर,रतन मोरे,विकास मोरे,यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी होणार आहे.
Thursday, April 27, 2017
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलनाचा इशारा
Posted by vidarbha on 6:45:00 PM in महेंद्र महाजनजैन / रिसोड - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment