मंदिरांना अवैध ठरवून ती पाडणार; मात्र सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी अनेकदा आदेश देऊनही मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई न करणे, हा कायदाद्रोह नव्हे का ?
मुंबई – प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी एका पाठोपाठ चार ट्वीट करतांना म्हटले आहे, ‘मी मुसलमान नाही; मात्र तरीही मला अजानचा आवाज ऐकून उठावे लागते. भारतात बळजोरीने चालणार्या या धार्मिक रुढी केव्हा थांबणार आहेत ?’ जेव्हा महंमद यांनी इस्लाम धर्म स्थापन केला, तेव्हा वीज नव्हती; मग एडिसन यांच्या शोधामुळे हा आवाज का सहन करावा लागत आहे ? मला वाटत नाही की, कुठल्या देवळात, गुरुद्वारामध्ये विजेचा वापर करून त्या धर्माचे पालन न करणार्या लोकांना बळजोरीने झोपेतून उठवले जाते. ही (अजान ऐकायला लावणे) तर गुंडगिरी आहे.’
काही मुसलमानांनी सोनू निगम यांच्या विधानाचे स्वागत केले आहे. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या काही जणांनी निगम यांच्यावर अश्लाघ्य टीका केली आहे, तर हिंदू आणि इतर धर्मांचे लोक सोनू निगमची पाठ थोपटत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी टीका करतांना म्हटले की, सोनू निगम यांना अजानचा आवाज सहन होत नसेल, तर त्यांनी अशा भागात राहू नये. (हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदीसमोरून गेल्यावर किंवा मंदिरात आरती चालू झाल्यावर त्रास होणार्यांनीही त्या भागात राहू नये ! – संपादक)
साभार -दैनिक सनातन प्रभात वृत्तसंकेतस्थळ
Post a Comment