Monday, April 17, 2017
भोजनदान कार्यक्रमाचा हजारोंनी घेतला लाभ
Posted by vidarbha on 9:28:00 PM in महेन्द्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / रिसोड -
वाशिम - प्रज्ञासुर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त पिपल्स रिपब्लीकन पार्टी व राष्ट्रपाल बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने 14 एप्रिल रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात आयोजीत भोजनदान कार्यक्रमाचा हजारो नागरीकांनी लाभ घेतला. महामानवांच्या या जयंती दिनी जिल्हाभरातुन हजारो अनुयायी अभिवादन कार्यक्रमासाठी डॉ. आंबेडकर चौकात उपस्थित राहतात. त्यांच्यासाठी या भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पीआरपीचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार बळवंतराव अरखराव यांच्या हस्ते या भोजनदान कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हजारोंनी या भोजनदान कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी माणिकराव सोनोने, डॉ. विलास इंगळे, राजु धोंगडे, हरिदास बन्सोड, धम्मपाल पाईकराव, राजेंद्र अहिर, शेषराव धांडे, प्रकाश गणवीर, मधुकर जुमडे, अजय ढवळे, विनोद पट्टेबहादूर, पप्पु घुगे, विनोद तायडे, खिराडेसर, सिध्दार्थ गायकवाड, राजकुमार पडघाण, प्रविण पट्टेबहादूर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून भोजनाचा लाभ घेतला.
या भोजनदान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीआरपीचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, सरकार इंगोले, अनिल कांबळे, पांडूरंग अंभोरे, गजानन केशवाणी, पंडीतराव खडसे, राष्ट्रपाल हिवराळे, गना कांबळे, महादेव कांबळे, रवि भगत, नितीन कांबळे, राजेश पट्टेबहादूर, प्रकाश गायकवाड, संतोष वाघमारे, अजय पट्टेबहादूर, संतोष खंडारे, आकाश खंडारे, अमोल गवई, विजय पट्टेबहादूर, सुबोध कांबळे, दिपक हिवराळे, महादेव जोगदंड, महेश परवरे, आकाश मुदीराज, अनिकेत नकले, अभय नकले, अजय नकले, दशरथ ठाकुर, सागर चहारे, बजरंग चौधरी, विकी वरखम, शुभम केळकर, अक्षय ठाकुर, अंकित डाळ, शेख चौधरी, विशाल बायवार, अनिकेत जाधव, अक्षय आवारे, गिरीषकुमार, आदित्य नकले, आकाश कोठेकर, जगदंब ग्रुप, महादेव उफाडे, आकाश इंगळे, सिध्दार्थ कांबळे, प्रविण इंगोले, अरुण इंगळे, सुधाकर इंगळे, राजेश्वर लबडे, आतिश उफाडे यांच्यासह दलित मुक्ती सेना, रिपब्लीकन युथ फोर्स, रमाई महिला बिग्रेड, राष्ट्रीय मजदूर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेना आदींच्या कार्यकत्यार्र्ंनी अथक परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वी केला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment