Monday, April 17, 2017
जिल्हाधिकारी यांनी केले दोन गावात श्रमदान
Posted by vidarbha on 9:26:00 PM in महेन्द्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / रिसोड -
वाशिम, कारंजा तालुक्यातील ग्राम जानोरी व जयपूर येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे व तहसीलदार सचिन पाटील व सर्वधन संस्थेचे डॉ निलेश हेडा व नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी , मंडळ अधिकारी तलाठी वर्ग यांनी भेट देऊन गावकर्याचा उत्साह वाढविण्यासाठी जानोरी येथे शेताच्या बांध बंदिस्त कामाचे श्रमदान केले.व जयपूर येथे श्रमदानातून तयार केलेल्या 500 मीटर सीसीटीच्या कामाची पाहणी व शेततळ भूमिपूजन करून खोदकाम करून श्रमदान केले. याप्रसंगी युवा संस्थेचे वसंता इंगळे यांनी श्रमदानातून पुढे येणाऱ्या गावासाठी 100 टिकास व 100 फावडे व 100 टोपले भेट दिलेत. यापैकी काही साहित्याचे वाटप जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी सराच्या हस्ते जयपूर सरपंच विजय काळे यांना भेट दिले. तसेच या प्रसंगी जयपूरचे ग्रामसेवक नरेश गजभिये यांनी एक महिन्याचा पगार जलसंधारणाच्या कामी दिला व धनादेश सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जयपूर सरपंच यांना दिला. तसेच काकडशिवणी ग्रामसेवक ठोकबर्डे, तांत्रिक अधिकारी प स सचिन उदरे यांनी सुद्धा एक महिन्याचा पगार जलसंधारणाच्या कामी दिल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तिघांचे अभिनंदन करून श्रमदान करत असलेल्या गावकाऱयांसोबत संवाद साधला। श्रमदान व गावाची एकजूट झाल्याचे दिसले. सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत भाग घेऊन गावाला पाणीदार करण्याचा आपला संकल्प व कष्ट हे वाटर कप मिळवून देतील व गाव पाणीदार होईल अशा शुभेच्छा दिल्यात.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment