चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
महाराष्ट्र - गुजरात राज्यांच्या सीमांवर अचलपुरचे आमदार तथा प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांची सीएम टू पीएम ही आसूड यात्रा अडवण्यात आली होती. तसेच गुजरात राज्यात प्रवेश करताच आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांना गुजरात पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीचार्ज करून ताब्यात घेतले होते. पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जचा स्थानिक प्रहार संघटनेतर्फे निषेध करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी व स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी ‘सीएम टू पीएम’ अशी शेतकरी आसूड यात्रा घेऊन निघालेल्या आमदार बच्चू कडू यांना गुजरातच्या सीमेवर अडवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगरमधील निवासस्थानी शुक्रवारी आसूड यात्रा पोहोचणार होती. तत्पूर्वीच नंदूरबार येथील नवापूर चेकपोस्टवर गुजरात पोलिसांनी ही आसूड यात्रा रोखली. त्यांनतर लाठीचार्ज करीत आ. बच्चु कडुंसह आंदोलकांना अटक केली होती. गुजरात पोलिसांची ही दडपशाही असुन त्याचा निषेध स्थानिक प्रहार संघटनेने केला. स्थानिक उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे यांना याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रहारचे तालुका प्रमुख सौरभ इंगळेसह शहर प्रमुख प्रदीप नाइक, अमदोरी शाखा प्रमुख गौरव तायवाडे, मनीष कोहरे, सूरज चव्हाण, शुभम पाटिल, प्रफुल्ल मारोटकर, राहुल अंबापुरे, लोकेश मानकर, सचिन इमले, विलास लांबकासे, मंगेश जमदार, प्रफुल्ल बनसोड
आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Thursday, April 27, 2017
आसुड यात्रेवर गुजरात पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध प्रहार संघटनेतर्फे एसडीओंना निवेदन
Posted by vidarbha on 9:06:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment