चांदुर रेल्वेतील रेल्वे स्टेशन ते दिपोरी रेल्वे स्टेशन दरम्यान कि.मी. ६९५/१८ - २० जवळील डीएचआरडी च्या नालीमध्ये ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी एक पुरूष जातीचा अंदाजे ४५ वयोगटाचा, उंची ५ फुट २ इंच, रंग सावळा, अंगात पांढऱ्या रंगाचा चौकटीचा शर्ट (निळी चौकट), काळी बनियान, कथीया रंगाचा फुलपैंट, निळी निकर अशा वर्णनाचा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळुन आला. याची स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यु क्र. ४९/१६ कलम १७४ जा. फौ. अन्वये नोंद करण्यात आली आहे.
सदर इसमाची ओळख अद्यापपावेतो पटली नसुन चांदुर रेल्वे पोलीस त्याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहे. तरीही वरील वर्णनाचा इसम हरविलेला असल्यास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन दुरध्वनी क्र. ०७२२२- २५४०३६ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment