(मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना सेवानिवृत्त कर्मचारी)
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
चांदूर रेल्वे नगरपालीकेने १/०१/२००६ पासुन ६वा वेतन आयोग लागु केला. चांदूर रेल्वे नगरपालीकेतून
२२ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १/०४/२००९ पासुन सहावा वेतन
आयोगानुसार सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. परंतु १/०१/२००६ ते ३१/०३/२००९ पर्यंत असे एकूण
३९ महिण्यांची निवृत्तीवेतनाची थकबाकी अद्यापही मिळालेली नाही. त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी १०
वर्षापासून न.प.प्रशासनाचे उबंरठे झिजवित आहे. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. शेवटी त्यांनी
लोकआयुक्तांचे दरवाजे ठोठावले. लोकआयुक्तांनी न.प.प्रशासनाला त्वरीत कारवाई करण्याचे आदेश
दिल्यानंतरही नगरपालीका प्रशासन कारवाई केली नाही.त्यामूळे बुधवारी (ता.२६) २२ सेवानिवृत्त
कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन मुख्याधिकाऱ्याना देऊन त्वरीत कारवाई करा अन्यथा १ मे
महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषला बसण्याचा इशारा दिला.
चांदूर रेल्वे नगरपालीकेत विविध पदावर प्रदिर्घ काळ सेवा देऊन २२ कर्मचारी सेवानिवृत्त झाले.चांदूर
रेल्वे न.प.ने १/०१/२००६ ला कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागु केला.
हे सर्व २२ सेवानिवृत्त कर्मचारी १/०४/२००९ पासून सहाव्या वेतन आयोग प्रमाणे सेवानिवृत्ती वेतन
उचलत आहे.परंतु १/०१/२००६ ते १/०४/२००९ असे एकूण ३९महिण्याचे ९लाख ३५ हजार ११९
रूपये थकित आहे.या सर्वांनी वयाची ६५वी पार केली असून अनेकजन आजारी आहेत.त्यांच्या कुटूंबाला
या रक्कमेची औषधोपचारासाठी अत्यंत आवश्यकता आहे.त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी
न.प.प्रशासनला अर्ज, निवेदन देऊन वारंवार विनंती केली.परंतु प्रश्न मार्गी न लागल्याने सेवानिवृत्त
कर्मचाऱ्यांनी लोकआयुक्ताकडे धाव घेतली. लोकआयुक्तांनी दखल घेत हा प्रश्न त्वरीत निकाली काढा असे
आदेश १/०७/१६ला न.प.प्रशासनाला दिले.याला ९ महिण्याचा काळ लोटला तरी नगर परिषदेने कारवाई
केली नाही.त्यामूळे शेवटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतनाची थकबाकी त्वरीत द्या अन्यथा १ मे
महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषणला बसण्याचा इशारा मुख्याधिकारी,नगराध्यक्ष, उपविभागीय
अधिकारी, जिल्हाधिकारी, लोकआयुक्त, नगर विकास मंत्री व पालकमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून
दिला आहे. निवेदन देतांना मनोहर मानकानी, उत्तम गावंडे, हृदेश तिवारी, शांतीलाल कर्से, कलावती यादव,
मोरेश्वर झिंगरे, बलदेव वानखडे, सुलेमानशाह रहमानशाह, लताबाई सहारे यांच्यासह अनेकजन उपस्थित
होते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसाठी सकारात्मक निर्णय घेणार-मुख्याधिकारी पाटील
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ६ व्या वेतन आयोगानुसार असणारी थकबाकी देण्यासाठी नगराध्यक्षांशी चर्चा
करून १५ मे पर्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी यावेळी
सांगीतले.
Post a Comment