जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन --
वाशिम : नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक डॉ. दत्ता देशमुख यांनी मनमानी पध्दतीने केलेली निवड प्रक्रिया व नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हयात केलेल्या शासकीय कार्यक्रमात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप येथील युवा कोर पंकज गाडेकर, सौरभ गंगावने, पवन राऊत आदींनी केला आहे. वरील सर्व बाबींची चौकशी करुन नेहरु युवा केेंद्राचे जिल्हा समन्वयक डॉ. दत्ता देशमुख यांना निलंबित करण्याची मागणी करीत 30 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास सुरुवात केली एखारखात्या उन्हात युवकांचे उपोषण सुरू असून अद्यापर्यंत एकाही अधिकाऱयांनी उपोषण मंडपाला भेट न दिल्याने संताप व्यक्त होत आहे खुद्द जिल्हाधिकारी भ्रष्टयाचार करणाऱ्या डॉ दत्ता देशमुख यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप युवानी केला आहे उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने उपोषण करणाऱ्या युवकांची प्रकृती खालावली आहे जो पर्यंत डॉ दत्ता देशमुख यांना निलंंबीत करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही मरण आले तरी बेहत्तर अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली असल्याने प्रशासन पोलिसांना हाताशी धरून उपोषण तोडण्याचा डाव रचत असल्याचा आरोपही युवकांनी केला आहे.
नेहरू युवा केंद्र हे युवा विकासाकरीता स्थापन झालेले जिल्हयातील कार्यालय असुन ग्रामीण तसेच शहरी युवकांच्या विकासाकरीता हे कार्यालय स्थापन करण्यात आले. जिल्हयाच्या मुख्यालयी नेहरू युवा केंद्र कार्यालय स्थापन झाले तेव्हापासुन आजपर्यत या कार्यालयाचा गाडा प्रभारी जिल्हा युवासमन्वयक मनमानी पध्दतीने सांभाळत आहेत. जिल्हयात 14 युवा कोर तालुक्याचा गाडा हाकीत असुन मागील सत्रात उत्कृष्ट कार्य करून सुध्दा युवा कोरांना पुर्ननियुक्त न करता डॉ. दत्ता देशमुख यांनी मनमानी कारभार करत जवळच्या युवकांना नियुक्त करून सर्व नियम धाब्यावर बसविले. विशेश म्हणजे नियुक्ती देण्यात आलेल्या युवाकौरांचे नावानिशी जिल्हाधिकारी यांना निवडी संदर्भात महाले यांनी 16 मार्च रोजी निवेदन दिले. तर मुलाखतीच्या दिवशी 18 मार्च रोजी भगवान ढोले यांनी मुलाखतीत भ्रष्टटाचार होत असल्याबाबत निवेदन दिले. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी हे नेहरू युवा केंद्राचे अध्यक्ष असुन निवेदनाची साधी दखल सुध्दा घेतली नाही. यामुळे सामाजीक कार्य करून देखील युवाकौरांना हेतुपुरस्पर काढुन टाकण्यात आले. तर मुलाखतीला आलेल्या युवांना सुध्दा डावलण्यात आले. आमरण उपोषणाचे माध्यमातुन डॉ. दत्ता देशमुख यांचेवर कार्यवाहीची मागणीसह कार्यालयातील इतर सर्व गैरव्यवहाराची चौकशी करून जिल्हा युवा समन्वयक डॉ. दत्ता देषमुख यांचे निलंबन करण्यात यावे. सोबतच जिल्हा क्रीडा स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम यासह इतर आर्थीक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी युवाकौर पंकज गाडेकर, सौरभ गंगावणे, पवन राऊत यांनी केली आहे. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी गुरुवार, 30 मार्चपासुन आमरण उपोषणास सुरूवात करण्यात आली आहे.
जिल्हयातील युवामंडळातील युवकांसह, सामाजीक संस्था, संघटनांनी आमरण उपोषणास पाठींबा दिला असुन यापुर्वीही नेहरू युवा केंद्राच्या कारभाराबाबत युवावर्गाने रस्त्यावर उतरून आमरण उपोषण केले होते.
उपोषण कर्त्या युवानी मेलो तरी बेहत्तर पण डॉ देशमुख यांना निलंबित करे पर्यंत उपोषण सोडणारा नसल्याचा पावित्रा घेत त्यांनी दवाखासण्यात भरती होण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकारी उपोषण चिरडून टाकण्याच्या तयारीत असल्याचा आरोप युवकांनी यावेळी केला आहे
--------------------------------------------

Post a Comment