स्थानिक ग्रामिण रूग्णालयात आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव गवई होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन वैद्यकीय अधिक्षक डॉ. मरसकोल्हे, डॉ. खरात, डॉ. तिवारी, भाऊराव वरठे, पत्रकार प्रा. रविंद्र मेंढे, नगरसेवक बच्चु वानरे, गुड्डु बजाज आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. तसेच उत्तमराव गवई यांनी अध्यक्षीय भाषण केले. यानंतर शहरातील समता विचार संघटनेच्या वतीने ग्रामिण रूग्णालयात बुंदी व बिस्कीट वाटप करण्यात आले. तसेच यावेळी नवीन वाटर कुलरचे ही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन उमेश गोंडाणे यांनी तर आभार प्रदर्शन अमित बेलसरे यांनी केले.
यावेळी समता विचार संघटनेचे अध्यक्ष भास्कर बनसोड, उपाध्यक्ष सुशिल मेश्राम, सचिव प्रकाश रंगारी, सदस्य उमेश गोंडाणे, बबन देवपारे, मुरलीधर भगत, प्रदिप घोडेस्वार, गौतम वाकडे, आदेश बनसोड, संजय बेंदले, प्रफुल सवाई, विजय सोनोने, हर्षना बेंदले, गजानन कांबळे, विजय बनसोड, प्रफुल स्थुल, पद्माकर बनसोड, सुमेध मेहरे, दिपक भगत, किशोर बनसोड, जितेंद्र मकेश्वर, निरंजन गोल्हे, अनंत गजबे आदींची उपस्थिती होती.
Post a Comment