Saturday, April 29, 2017
सुभाष नानवटे यांना राज्यस्तरीय जलमित्र पुरस्कार जाहीर
Posted by vidarbha on 7:55:00 AM in महेन्द्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / रिसोड -
वाशीम - जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणार्या
महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका, गाव व व्यक्तींना महात्मा ज्योतीबा फुले
जलमित्र पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये तालुक्यातील दोडकी येथील
सुभाष उत्तम नानवटे यांना जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट कामगिरी
केल्याबद्दल सन 2015-16 चा वैयक्तीक स्वरुपाचा राज्यस्तरीय जलमित्र हा
व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतचा राज्य शासनाच्या
जलसंधारण विभागाचा शासन निर्णय 15 एप्रिल रोजी प्रसृत झाला आहे. शासनाने
5 डिसेंबर 2014 अन्वये जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या जलयुक्त
शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणार्या गावे, तालुके, जिल्हे,
वैयक्तीक पुरस्कार यांना 28 सप्टेंबर 2016 च्या शासन निर्णयाव्दारे
मंंजुरी देण्यात आली.
प्रगतीशिल शेतकरी तथा सामाजीक कार्यकर्ते सुभाष नानवटे यांनी आपल्या
गावात जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत गावकर्यांच्या सामुहिक प्रयत्नातुन
कधी काळी दुष्काळाच्या झळा सोसणार्या वाळकी-दोडकी या गावाचा पाणी
प्रश्न मिटवला आहे. वाळकी-दोडकी येथे जलयुक्त शिवार अभियान व
लोकसहभागातून गाव तलाव, नाला खोलीकरण, शेततळे आदी जलसंधारणाची कामे
मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहेत. गावाची आता टँकरयुक्ती ते टँकरमुक्त
गावाकडे वाटचाल सुरु झाली आहे. गावात जलयुक्त शिवार अंतर्गत लोकसहभागातून
उद्दीष्ट साधण्यात आले असून गावनदीचेही रुंदीकरण करण्यात आले आहेत. सुभाष
नानवटे यांच्या पुढाकाराने पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळकी-दोडकी
गावांत जलसंधारण विषयक जाणीव जागृतीचे प्रयत्न करण्यात आले. जलयुक्त
शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून नानवटे यांनी केेलेल्या या कार्याची दखल
शासनाने त्यांना राज्यस्तरीय जलमित्र पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांना
मिळालेल्या या पुरस्कारामुळे वाशीम जिल्हयाची मान जलयुक्त शिवार
क्षेत्रात उंचावली असून नानवटे यांच्या कौतूकाचा वर्षाव होत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment