बादल डकरे / चांदुर बाजार -
माहितीच्या अधिकारात प्रथम अपील होऊनही चांदुर बाजार पंचायत समिती कार्यलयाने अर्जदारास आवश्यक ती माहिती न दिल्याने अर्जदार शशिकांत निचत यांनी राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील केले होते.
चांदुर बाजार तालुक्यातील ग्रा प शिरजगाव बंड येथे शशिकांत निचत प्रल्हादपूर यानि शी.बंड ग्रामपंचायत कार्यलाय यांच्याकडे 20-6-14 रोजी माहिती अधिकारात माहिती मागितली होती.कार्यलाय मार्फत सन 12/13च्या आर्थिक वर्षाच्या फंडाची माहिती मागितली होती 30 दिवसाच्या आत माहिती मिळाली नाही कायद्याच्या तरतुदी नुसार निचत यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी तथा प्रथम माहिती अपील अधिकारी यांच्या कडे प्रथम अपील दाखल केली या अपिलेवर प्रथम अपिलीत जनमाहिती अधिकारी उपस्थित नव्हते म्हणून तत्कालीन प्रथम अपील अधिकारी यांनी दुसरी सुनावणी घेतली 29/10/14 रोजी दुसरी प्रथम अपील ची दुसरी सुनावणी घेण्यात आली.गटविकास अधिकारी यांनी अपीलकर्त्यांना सात दिवसामध्ये माहिती देण्यात यावे अशा आदेश काढला.पण जण माहिती अधिकारी शी बंड यांनी कोणत्याच प्रकारे माहिती पुरविली नाही.प्रथम अपिलात प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश माहिती आयुक्त यांनी दिले आहे असे असताना माहिती न पुरविल्यामुळे अखरे शशिकांत निचत यांनी राज्य माहिती आयोगाकडे 14-11-14 रोजी दुसरी अपील दाखल केली तरी याची सुनावणी 2-5-2017 आहे .प्रथम माहिती अधिकार मध्ये माहिती मोरे यांनी दिली नाही त्यामुळे आता त्यांच्या कृती कडे अपील कर्ता शशिकांत निचत यांचे लक्ष तर आहे सोबतच संपूर्ण माहिती अधिकाराची प्रणाली सुद्या या कडे लक्ष देत आहे.प्रथम अपिलीय गैरहजर असल्याने आणि आता पर्यंत माहिती न दिल्याने मोरे यांच्यावर कोणती कार्यवाही होणार हे पाहणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे माहिती अधिकाराचे नियमाला डावळणे योग्य आहे की हे पाहावेच लागेल
Saturday, April 29, 2017
शिरजगाव बंड ग्रा .प.कार्यलयचे प्रकरण माहिती आयुक्तांच्या दालनात -माहिती न दिल्यामुळे शशिकांत निचत यांचे दुसरे अपील
Posted by vidarbha on 3:33:00 PM in बादल डकरे / चांदुर बाजार - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment