गो सी टोम्पे सार्वजनिक ट्रस्ट नि जपली सामाजिक बांधिलकी
धुमधडाक्यात पार पडला लग्न सोहळा
वऱ्हाडी, अनेक प्रशासकीय अधिकारी,तर खासदार अडसूळ याची पण उपस्थिती
सतत 3 वर्ष पासून महाराष्ट्र मध्ये नापिकी,दुष्काळ,अतिरिक्त पाऊस यामुळे आपल्या देशाचा कणा समजला जाणारा शेतकरी हा मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी तर झालच त्याच प्रमाणे त्याच्या शेती मध्ये त्याला मदत करणार शेतमजूर याला पण योग्य तास प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नसल्याचे चिट आहे.मात्र एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये शेतकरी आणि शेतमजूर यांच्या मूला मुलीचा लग्नाचा प्रश हा त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास लावतो.या सर्व गोष्टीवर अंकुश लागावा याकरिता चांदुर बाजार तालुक्या मध्ये मागील वर्षी पासून गो सी टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट यांनी शेतकरी ,शेतमजूर यांच्या मुला मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली आणि मागील वर्षी पासून सामूहिक लग्न सोहळ्याला सुरुवात केली.
सुरुवातीला लग्न सोहळा साठी आलेल्या एकूण 51 वर यांची संपूर्ण शहरातून वरात काढण्यात आली त्यानंतर सर्व धर्मातील परंपरे प्रमाणे लग्न लावण्यात आले.मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिष बाजी यावेळी पाहायला मिडाळी. त्याच प्रमाणे उत्कृस्ट भोजन सुध्या याठिकाणी उपलब्ध करण्यात आले होते.
मागील दिवसामध्ये कोदोरी येथील संदीप दुर्वे याचं घराला आग लागली होती.त्यामध्ये त्याच्या लग्नाला लागणाऱ्या साहित्य जळून खाक झाले होते याठिकाणी त्यांचे पण लग्न लावण्यात आले आणि त्याला ड्रा राजेश उभाड कडून 5000 आर्थिक मदत देण्यात आली.
वर आणि वधू याना ट्रस्ट ने उपहार म्हणून सांसारिक जीवनाला लागणाऱ्या सर्व वस्तू देन्यात आला
या सामूहिक विवाह सोहळ्याला ला अमरावती जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता धोमने ,भाजपा नेते अशोकराव बन्सोड, चांदुर बाजार नगर अध्यक्ष रवींद्र पवार,उपाध्यक्ष लाविना आकोलकार, गो सी टोम्पे महाविध्यालय सार्वजनिक ट्रस्ट ,शेतकरी सेवा समिती ,चांदुर बाजार व श्री संत गजानन महाराज सेवा समिती चांदुर बाजार पदाधिकारी,संस्थेचे सचिव आणि लग्न सोहळ्याचे मुख्य आयोजक भास्कर टोम्पे,महाविद्यालयाचे प्राचार्य विजय टोम्पे,मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी मनोहर कडू,अचलपूर उपविभागीय अधिकारी व्यकट राठोड,ड्रॉ राजेश उभाड,तहसीलदार शिल्पा बोबडे,ठाणेदार सदानन मानकर ,सामाजिक कार्यकर्ट्रे मनोज कटारिया,विनोद कोरडे,चांदुर बाजार नगर परिषद संचालक आनंद अहिर,अतुल रघुवंशी,आबिद हुसेन पत्रकार मदन भाटे,किशोर मेटे,तसेच युवा नेतृव मुरली माकोडे आणि त्यांच्या सोबत मोठ्या युवा वर्ग या लग्न सोहळ्याला उपस्थित होते.
Post a Comment