तोट्याने विकावा लागळा कांदा
बादल डकरे / चांदूर बाजार -
चांदुर बाजार तालुक्यामध्ये चक्क कांदा काढलेला असताना व्यापारी याने पसंत केलेला कांदा माती असल्याचे सांगून मोजणी केलीच नाही शेवटी कांदा परिपक्क होण्याऐवजी काढल्याने शेतकरी याला तो कांदा प्रति किंटल 75 रुपये तोट्याने विकावा लागला.
(शेतकरी चंदूलालजी टिंगणे) |
कांद्याच्या काढणी ला चांदुर बाजार तालुक्यामध्ये सुरुवात झाली असून व्यापारी पुन्हा शेतकरी याची फसवणूक करीत असल्याचे चित्र आहे.व्यपारी याने शेतकरी यांच्या शेतातील कांदा तीन वेळा पहिला त्या नंतर शेतकरी याला कांदा लवकर काढणी करायला सांगितले आणि मोजणी ज्या दिवशी कांद्याला माती असल्याचे सांगून मोजणी न करीत निघून गेले.शेतकरी याने व्यापारी याला प्रति किंटल 550 रुपये विकला होता मात्र मोजणी न केल्याने शेतकरी याला तो न मोजलेला कांडा प्रति किंटल 425 रुपये या किमतीत दुसऱ्या व्यपारी याला विकावा लागला.त्यामुळे शेतकरी चंदूलालजी टिंगणे याला प्रति किंटल मागे 75 रुपये तोटा तर झालाच उलट सरकार ने हि हमीभाव 1000 दिला असता तर आज ही परिस्तिथी झाली नसल्याचे वक्तव्य टिंगणे यांनी व्यक्त केले.
टिंगणे यांनी आपल्या मौज कोदोरी शेत शिवारामध्ये एका एकर मध्ये कांद्याची लागवड जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात केली होती त्यांना लागवड ते आतापर्यंत खर्च हा 40000 च्या घरात आहे.
व्यापारी यांनी पहिलाद तीन वेळा पाहणी केली आणि अचानक मोजणी च्या दिवशी माती असल्याचे सांगून मोजणी केली नाही.खर्च हा आवाद्यव्य आहे राज्य सरकार ने निदान सुरुवातीला 1000 रुपये प्रति किंटल भाव दयावा.जेणे करून शेतकरी याला मान्सून साठी अल्प श्या प्रमाणात लाभ होईल
Post a Comment