निर्मात्या विधि कासलीवाल करणार हा चित्रपट प्रदर्शित
अनिल चौधरी : पुणे :-
वितरक न मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित रहावं लागत आहे. या यादीतील काही नावंम्हणजे 'कासव', 'दशक्रिया', 'हलाल'... याच यादीत काही दिवसांपूर्वी अजून एक नाव होतं 'रिंगण'... मात्र यादुष्टचक्रातून 'रिंगण' चित्रपटाची मुक्तता झाली आहे.सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. याचित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात 63 वा राष्ट्रीयपुरस्कारावर रिंगण आपली मोहोर उमटवली त्याबरोबरच 53व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्टचित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन,सर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्करांवर आपले नाव कोरले. त्याशिवाय कान्स, स्टट्टगर्ट (जर्मन), लंडन, टोरांटो याकाही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिलं.या राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारा रिंगण अखेर प्रदर्शनासाठी सज्जझाला आहे. आपली निर्मिती प्रेक्षकांसाठी मनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधि कासलीवालयांनी प्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी उमेद जागवणारा, मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ प्रेक्षकांना प्रेझेंट करायचे ठरवलेआहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीलायेणार आहे.
Post a Comment