महेंद्र महाजन जैन / रिसोड -
मालेगांव :किन्हीराजा येथील विद्युत वितरण कंपनी मालेगांव उपविभागातील कर्मचारी निलेश भगवान डिघोळे यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अकोला परिमंडळ च्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन , कामगार दिन व गुणगौरव सोहळ्या निमित्त या वर्षीचा उत्कृष्ट वरिष्ठ तंत्रण्य पुरस्कार अकोला येथे प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने दरवर्षी वाहिन्यांची देखभाल करणे , अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे , त्याद्वारे विद्युत पुरवठा सुरळीत करणे , ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे ही कर्तव्य बजावत असताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता , कर्तव्यदक्षता , निष्ठा या गुणांचा गौरव करून निलेश भगवान डिघोळे यांना कामगार दिन निमित्त या वर्षीचा उत्कृष्ट वरिष्ठ तंत्रण्य पुरस्कार अकोला परिमंडळ येथे अकोला चे मुख्य अभियंता यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अकोला वाशिम बुलढाना सह इतर जिल्हयातील कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. निलेश भगवान डिघोळे यांना कामगार दिन निमित्त पुरस्कार प्रदान करण्यात आल्या बद्दल मालेगांव येथे विद्युत वितरण कंपनी चे राजेश चव्हाण साहेब अमोल नवरे साहेब वसंत केशव हाके शरद रामटेक सह कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.व मागासवर्गीय संघटन शाखा मालेगांव यांनी सुध्दा त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment