महेन्द्र महाजन जैन / रिसोड-
सेनगांव:- सेनगांव शहरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असुन नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली असल्याने सेनगांव शहराला दि.०२ मे मंगळवार पासुन टँकंरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहीती नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली.
सेनगांव नगरपंचायत च्या पाणी नियोजन स्त्रोतातील पाणी कमी झाल्याने सेनगांव शहरातील प्रत्येक प्रभागात आठ दिवसांनी पाणी येत होते ते ही कमी प्रमाणात यामुळे सेनगांव शहरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. दरम्यान यामुळे शहरातील नागरीकांना पाणी आणन्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. आज दि.१ मे सोमवार रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सकाळी ०९ वाजता नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी शैलैश फडसे, सेनगाव नगराध्यक्ष इंजि.अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीटंचाई निवारणासाठी बैठक घेण्यात आली. याबैठकीत सेनगांव शहरातील १७ प्रभागात पाणीपुरवठा करण्यासाठी चार टँकंर ठरविण्यात आले असुन प्रभागनिहाय पाणीपुरवठा असुन रोज हे चार ही कँटंर एकाच प्रभागात जातील यामुळे टँकंरवर पाणी भरण्यासाठी गर्दी होणार नाही व हे पाणी प्रत्येक नागरीकांना मुबलक प्रमाणित मिळेल. याबैठकीला उप नगराध्यक्ष कैलास देशमुख, नगरसेवक आप्पासाहेब देशमुख, प्रकाशराव देशमुख, विलासराव खाडे, ऊमेश देशमुख, अजय विटकरे, संदिप बहिरे, दिपक फटागंळे, प्रविण महाजन, डाँ.सुजित देशमुख, विष्णु खंदारे आदी नगरसेवकासह कार्यालयीन अधिक्षक गव्हाणकर, नगरपंचायत कर्मचारी परसराम कोकाटे, कैलास बिडकर, विशाल जारे आदी उपस्थित होते. सेनगाव नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी शैलैष फडसे यांनी तेजन्युज हेडलाईन्स च्या प्रतिनीधीशी बोलतांनी सांगितले की, सेनगांव शहराला उद्या पासुन पाणीपुरवठा केला जाईल.

Post a Comment