चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)
तालुक्यातील घुईखेड येथील पुनर्वसनमध्ये गेल्या एका तपापासून पाणीपुरवठ्य़ाच्या नावावर करोडो रुपये बेंबळा प्रकल्प अधिकारी यांनी खर्च केले असून पुनर्वसित भागामध्ये अजुनही १५ ते १८ दिवसानंतर पाणी मिळते. या पाणीटंचाईमुळे घुईखेडवासी त्रस्त झाले आहेत.
चांदुर रेल्वेपासुन १७ कि.मी. अंतरावर असलेले घुईखेड हे गाव बेंबळा प्रकल्पांतर्गत पुनर्वसीत झाले असून गेल्या बारा वर्षापासून ही प्रक्रीया सुरु आहे. बेंबळा प्रकल्पाचा सर्वात जास्त खर्च पाणी पुरवठय़ावर असून अद्यापही घुईखेड पुनर्वसन मधील काही भागामध्ये टॅंकरने पाणी पुरवठा केल्या जातो व तोही १५ ते १८ दिवसानंतर. विशेष म्हणजे घुईखेड मध्ये पाण्याची कमतरता नाही. पाणी मुबलक प्रमाणात असून पाणी पुरवठय़ाकरीता दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्या भरल्या जात नाही तर कधी भरल्याच तर अध्र्यापेक्षा जास्त गावामध्ये पाणीच जात नाही.
गावकर्यांच्या मते बेंबळा प्रकल्प अधिकार्यांना खरच घुईखेड वासीयांना पाणी पुरवठा करायचा आहे का? की पाणी पुरवठय़ाच्या नावावर शासनाचे करोडो रुपये कंत्राटदाराच्या घशात घालायचे आहे. कारण आजपर्यंत बेंबळा प्रकल्पाने पाणी पुरवठय़ाच्या नावावर साडेतिन कोटी खर्च केला असून एवढय़ा रकमेमध्ये घुईखेड वासीयांच्या प्रत्येक घरी एक बोअर केले असते तरी एवढा पैसा खर्च झाला नसता. एका पाणी पुरवठय़ाच्या नावावर एवढा भ्रष्टाचार होतो तर नागरी सुविधा पुरविण्यासाठी किती भ्रष्टाचार झाला असेल. तरी वरील बाबी चौकशी करुन भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.
Monday, May 8, 2017
बळा प्रकल्पामुळे पुनर्वसित घुईखेडची व्यथा कोट्यवधीचा खर्च करूनही पाणीटंचाई कायम!
Posted by vidarbha on 7:39:00 AM in चांदुर रेल्वे- (शहेजाद खान) | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment