Wednesday, May 3, 2017
शिक्षण क्षेत्रातील सावळागोंधळ थांबवण्यात यावा याकरिता अचलपूर मनसेचे तिव्र आंदोलन
Posted by vidarbha on 9:57:00 PM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /- | Comments : 0
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
शिक्षण क्षेत्रातील वाढत्या सावळ्या गोंधळला त्वरित आवर घालावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानीक महानवनिर्माण सेनेने गटशिक्षणाधिकारी यांना दिला होता अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असे ही निवेदनात म्हटले होते.
निवेदनात केलेल्या मागण्यांची पुर्तता न झाल्याने आज सकाळी ११ वाजता पंचायत समिती अचलपूर कार्यालया समोर शहर अध्यक्ष विवेक महल्ले यांच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलन करण्यात आले याप्रसंगी मनसेचे अंकुश पाटील,निखील दहिहांडे,दिनेश पवार,पंकज पर्वतकर,वेदांत देशमुख,चेतन खडसे,सागर डांगे,अभिजित खडसे,राज वाडेकर,अनिकेत काळे,संकेत सदांशिव,रितेश कोठाळे,संकेत चित्रकार,राज बरडे,सुशिल मिश्रा,विलास चावरे,प्रणय पाटील,कैलाश गाडबैल व असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.त्यांच्या मागण्या तालुक्यातील खाजगी अनुदानीत व विनाअनुदानीत शाळेमधे घेण्यात येणारे डोनेशन,अवाजवी शुल्क यावर नियंत्रण करण्यात यावे.प्रवेशीत विद्यार्थ्यांची व २५% आरक्षित विद्यार्थी संख्या स्पष्ट शाळेच्या फलकावर लिहिलेली असावी,शाळेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी,विषय तज्ञ यांनी घेण्यात येणा-या चाचण्या व परीक्षे दरम्यान व वरचेवर दौरे करावे,आसपासच्या परिसरात नर्सरी,केजी 1 व 2 ला परवानगी देवू नये,मुख्याध्यापक व शिक्षक मुख्यालयी राहण्याचे आदेश काढून काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे होत नसल्यास संबधितावर कारवाई करण्यात यावी असे व इतर अनेक मागण्या करिता आज मनसेने तिव्र आंदोलन केले पोलीस प्रशासनाचे मनाईला न जुमानता मनसैनीकांनी केलेल्या आंदोलनान परिसरात उन्हाच्या तीव्रतेसोबत अंदोलनाने तापमान वाढले होते.पोलीसांच्या बंदोबस्ताने छावणीचे रूप धारण केले होते.आंदोलन ची तीव्रता लक्षात घेऊन गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल व कार्यवाही जवळपास केलेली असल्याचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन करत्यांंचे समाधान केले परतवाडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार अवचार यांनी चोख बंदोबस्त ठेवून आंदोलन शातंतेत पार पाडले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment