प्रतिनिधी / महेंद्र मिश्रा
मागील ०५ महिन्यापासून शासनाने नाफेड अंतर्गत प्रत्यक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहाय्याने तूर खरेदी करण्यास सुरुवात केली की या माध्यमातून अन्नदाता असलेला शेतकरी सुखावेल परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला सत्ताधारिव बिनसत्ताधारि म्हणजेच नेते मंडळी यांनी फक्त पानेच पुसली ही बाब जग जाहीर झाली की प्रत्येक नाफेड केंद्रावर तूर खरेदी करण्यात मोठा घोळ झाला ज्याची हमी स्वतः मुख्यमंत्री यांनी चार दिवस अगोदर दिली.
एकरी ०५ क्विंटल तूर विकत घ्यावी असे स्पष्ट आदेश असतांना देखील नेते मंडळी व वजनदसर व्यापारी यांनी मिळून आपला संपूर्ण म्हणजे १०० ते२५० पोती तूर प्रत्येकी नावाने नाफेडला विकली या सर्व प्रकारावर सर्वाची नजर होति आणी असाच प्रकार बुलढाणा जिल्हातील शेगांव कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा चालू होता.
या अगोदर हा असा प्रकार येथे होत आहे हे आम्ही आपल्याला दाखवले सुद्धा होते पण काहीही होत नव्हते पण तक्रारी येत होत्या. म्हणून जिल्हा उपनिबंधक यांनी एक समिती नेमून येथे झालेल्या प्रकारची चैकाशी करण्याचे आदेश दिले परंतु या समितीला कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक शेषराव पाहुरकर यांनी आक्षेप घेत २४/०४/२०१७ रोजी हरकत अर्ज टाकला की या समितीत जे सदस्य आहेत ते भ्रष्टाचारी असून त्याच्यावर नागपूर खंडपीठात खटले चालू आहेत शिवाय ते सभापती गोविंद मिरगे यांनी नातेवाईक असल्यामुळे ते योग्य व निस्वार्थ चैकाशी करणार नाही.
या उलट सुधार ढोले यांनी माहितीच्या अधिकार अंतर्गत माहिती घेतली असता शेगांव काही लोकांनि अंधारात संगनमताने आपल्या तुरीचे काये केले १००ते २५० पोती नफेडला विकली त्यात त्यांनी सचिव कर्मचारी खरेदी विक्री अधिकारी व काही संचकांनी शेतकऱ्यांचा मानसिक छळ केला म्हणून त्यांनी चैकाशी शासनाने करवी शेकऱ्यांनी योग्य न्याय द्यावा असे आवाहन केले.
Post a Comment