चांदुर रेल्वे / शहेजाद खान /-
स्थानिक सुयश बहुद्देशीय संस्थेमार्फत आयोजित उन्हाळी व्यक्तिमत्व विकास व संस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. गेल्या 10 दिवसापासून या शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये 100 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. ह्या शिबिरामध्ये योग प्रशिक्षण, कराटे, जिम्नॅस्टिक, क्रीडा, नाटक, डान्स, गायन, आरोग्य तपासणी, पथनाट्य, स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव, प्रभातफेरी द्वारे या सारख्या विषयावर शिबिराद्वारे प्रकाश टाकण्यात आला.तर बौद्धिक सत्रामध्ये दहा दिवस भारत गेडाम, प्रेमचंद अंबादे, सुनील वानखडे, ऍड. राजीव अंबापुरे, प्रा. तपोवींन पाटील, विनय कडू, पप्पू भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . अंधविद्यालयाचा आँक्रेस्ट्र बोलावून बहारदार धमाकेदार हिंदी मराठी गीत व महामानवांचे गीत गाऊन शिबिरांचे व प्रेक्षकांचे मन जिंकले. दहा दिवसांच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व गोष्टीचे ज्ञान संपादुन समारोपीय कार्यक्रमध्ये उत्कृष्ट असे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्यामध्ये उत्कृष्ट विद्यार्थ्यांनीला कु. रोशनी बी. मेश्राम हिला नितीन राठी यांच्याकडून सायकल देण्यात आली. उत्कृष्ट 5 विद्यार्थ्यांना सनी नितनवरे, हिमांशू वानखडे, प्राजक्ता गवई, वृषभ फुलझेले, राणी वानखडे. या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष देवानंद खुणे, प्रमुख पाहुणे महेश कलावटे, बंटी माकोडे, प्रणव भेंडे, सौ. स्वातीताई मेटे, सौ. शुभांगी वानरे, सौ. शारदा मेश्राम, राजू लांजेवार, सुमेद सरदार, चेतन भोले, प्रकाश वानखडे, राजू शिवणकर यांच्या हस्ते बक्षीस मानचिन्ह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम सरदार व नेहा वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व पालक वर्गानी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
दहा दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा वानखडे, नेहा वानखडे, किरण मेश्राम, रोशनी मेश्राम, कावेरी आठवले , बंटी मोखळे, शुभम देशमुख, सचिन उईके, अनिकेत दाभाडे, बबन वानखडे, राजु शिवणकर, राखी गेडाम, आचल जळीत, मोहिनी चवरे, आकाश जवंजाळ, अंकित वानखडे यांनी परिश्रम घेतले.
Wednesday, June 7, 2017
उन्हाळी व्यक्तिमत्त्व शिबिराचा समारोप संपन्न * उत्कृष्ट विद्यार्थीला सायकल वाटप * उत्कृष्ट 5 विद्यार्थाना मानचिन्ह व रोख रक्कम वाटप
Posted by vidarbha on 2:24:00 PM in चांदुर रेल्वे / शहेजाद खान /- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment