Wednesday, June 7, 2017
शेतकरी संप - चांदुर रेल्वे १०० टक्के कडकडीत बंद
Posted by vidarbha on 2:21:00 PM in चांदुर रेल्वे - ( शहेजाद खान ) | Comments : 0
चांदुर रेल्वे - ( शहेजाद खान )
नाशिक येथे रविवारी झालेल्या किसान क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शेतक-यांनी कडकडीत बंद पाळला आहे. अशातच चांदुर रेल्वे शहर सुध्दा सोमवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले.
शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (५ जून) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. याच अनुशंगाने चांदुर रेल्वे शहरात शेतकऱ्यांच्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरात १००% सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शहर बंद ठेवून कर्जमाफीबाबत घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी शहरातील जुना मोटार स्टैंड, सिनेमा चौक, गांधी चौक, अमरावती रोड, कुऱ्हा रोड आदी भागांतुन फेरीदेखील काढली. या बंदमध्ये शहरातील कॉंग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, जनता दल (सेक्युलर), माकपा आदी पक्षांसह किसान सभा, शेतकरी व विविध संघटनांचा समावेश होता. यानंतर किसान सभेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देविदास राऊत, नितीन गवळी, दिनकर निस्ताने, विनोद जोशी आदींची भाषणे झाली. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागु करण्यात यावा, विम्याचे पैसे तातडीने द्यावे, शेतकऱ्यांना तुरीच्या पैशांचा चेक त्वरीत देण्यात यावा, शेतकऱ्यांची शिल्लक राहिलेली तुर पुर्णत: देण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार दरवर्षी सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात यावे आदी मागण्या पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
या बंदमध्ये जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाने, नगराध्यक्ष शिट्टु सुर्यवंशी, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, शिवसेनेचे बंडु आंबटकर, राजु निंबर्ते, स्वप्निल मानकर, नगरसेवक प्रफुल्ल कोकाटे, महेश कलावटे, प्रणव भेंडे, प्रदिप वाघ, अरूणराव शेळके, अमोल होले, शिवाजीराव चौधरी, संजय डगवार, देविदास राऊत, कॉ. विनोद जोशी, कॉ. सागर दुर्योधन, कॉ. शिवाजीराव देशमुख, राजाभाऊ भैसे, कॉ. विजय रोडगे, दिनकर निस्ताने, धरमपाल वरघट, गौतम जवंजाळ यांसह शेकडो कार्यकर्ते- शेतकऱ्यांचा सहभाग होता.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment