BREAKING NEWS

Tuesday, June 13, 2017

अधिक पैसे आकारणाऱ्या 6 सेतु केंद्राची नोंदणी रद्द तक्रार निवारणासाठी 1077 क्रमांकावर संपर्क साधा


      भंडारा :-  


 भंडारा येथील सेतु सेवा केंद्रात विविध प्रमाणपत्रासाठी नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या 6 सेतु केंद्राची नोंदणी तहसिलदार संजय पवार यांनी आज रद्द केली आहे. अशा आशयाचे पत्र व्यवस्थापक महाऑनलाईन सेतु केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांना पाठविले.
         सेतु सेवा केंद्रात निर्धारित दरापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांना प्राप्त झाल्या. या अनुषंगाने भंडारा तालुक्यातील सेतु सेवा केंद्राची नायब तहसिलदार यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल तहसिलदार भंडारा यांना प्राप्त झाला असून 6 सेतु केंद्रामध्ये तयार करण्यात येणाऱ्या दाखल्यांकरीता लागणाऱ्या दराबाबत माहिती दर्शविणारे दर फलक लावण्यात आले नाही. तसेच सुविधा केंद्रामध्ये शासकीय दरापेक्षा  जास्त रक्कम 200 ते 300 रुपये अर्जदारांकडून घेतली जात असल्याचे चौकशीत निदर्शनास आले.
         यावरुन ममता अजय चरडे गणेशपूर भंडारा, प्रविण पत्तेवार ओम बुक डेपो शास्त्री नगर भंडारा, मोहम्मद सर्फराज नवाज, पटेल मेडीकल टिळक वार्ड भंडारा,  वसंत काकडे राजीव गांधी चौक भंडारा, प्रियंका जोशी काशी किराणा स्टोर्स भंडारा, सेतु केंद्र कोचे गॅस गोडाऊनजवळ खोखरला या सहा केंद्राची नोंदणी तहसिलदार भंडारा यांनी रद्द केली.
          नागरिकांना लागणाऱ्या विविध दाखल्यासाठी प्रशासनाने सेतु सेवा केंद्राची निर्मिती केली असून या सेतु सेवा केंद्रात प्रत्येक दाखल्यासाठी किती पैसे आकारले जातात. या माहितीचा 8/4 चा दर फलक प्रत्येक सेतु केंद्रावर लावावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. 
           वय, राष्ट्रियत्व आणि डोमोसाईल प्रमाणपत्रासाठी 33 रुपये, वरिष्ठ नागरिक प्रमाणपत्र 33 रुपये, निवासी दाखला 33 रुपये, उत्पन्नाचा दाखला 33 रुपये, सातबारा 23 रुपये, आठ अ  23 रुपये, जात प्रमाणपत्र 56 रुपये, नॉनक्रिमीलीयर 56  रुपये आणि नॉनक्रिमीलीयर रिनिव्हल 33 रुपये असे शासनाचे दर आहेत. या व्यतिरिक्त कुठलेही शुल्क नागरिकांनी अदा करु नये. सेतु केंद्रात या पेक्षा जास्त शुल्क मागितल्यास तहसिल कार्यालय 07184-252210 व जिल्हाधिकारी कार्यालय येथील 1077 या टोल फ्रि क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन तहसिलदार संजय पवार यांनी केले आहे.
        जिल्हयातील कुठल्याही सेतु केंद्रावर निर्धारित दरापेक्षा अधिकचे शुल्क न आकारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या असून असे शुल्क आकारणाऱ्या सेतु केंद्राची नोंदणी तात्काळ रद्द करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.
       

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.