पुणे-
हिंदू संघटन आणि राष्ट्रीयत्व यांना प्राधान्य देऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी गोव्यातील रामनाथी येथे ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज भारतात बहुसंख्यांकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाचे तुकडे होण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना प्राधान्य द्यायचे कि भारताची गौरवशाली परंपरा मानणाऱ्यां देशप्रेमींना प्राधान्य द्यायचे, हे ठरवण्याची आता वेळ आली आहे. ज्याप्रमाणे इस्लामी आतंकवादामुळे काश्मिरी हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, तशी परिस्थिती आज केरळ, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्येही ओढवली आहे. अशा वेळी हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून सनातन धर्माचे जागरण होऊन राष्ट्रविरोधी आवाजाला प्रत्युत्तर दिले जाईल, असे प्रतिपादन युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. गोवा येथे १४ ते १७ जून या कालावधीत होणार्याष सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची माहिती देण्यासाठी १२ जूनला येथील पत्रकार भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, गोरक्षक श्री. संजीबकुमार बसू, गार्गी सेवा फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे उपस्थित होते. श्री. पराग गोखले यांनी अधिवेशनाचा उद्देश, स्वरूप, व्याप्ती, सहभागी हिंदुत्वनिष्ठ, तसेच मागील अधिवेशनांची फलनिष्पत्ती यांविषयी अवगत केले. श्री. चंद्रशेखर तांदळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांचे १५ प्रतिनिधी उपस्थित होते.
Post a Comment