Friday, June 16, 2017
अचलपूरची तेजल दाभाडेला व्हायचे आहे साँफ्टवेअर इंजिनिअर
Posted by vidarbha on 6:59:00 AM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /- | Comments : 0
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी च्या निकालात स्थानिक सुबोध हायस्कूल ची तेजल निकेश दाभाडे हीला 93 टक्के गुण प्राप्त झाले.तिने हे यश अतीशय बिकट परिस्थितीत मिळविले.परीक्षेच्या तयारीत असतांना तीचा अपघात झाला व उजवा हात फँक्चर झाला तरी दुखापतीकडे लक्ष न देता तेजलने अभ्यासावरील आपले मन विचलित न होऊ देता आत्मविश्वासाने अभ्यास करून हे यश संपादन केले.तिला अशा परिस्थितीत तीची आई नीर्मला व वडील निकेश दाभाडे यांनी पुर्णपणे सहकार्य केले.तेजलने साँफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा व्यक्त केली तिने हि प्रेरणा आपल्या मामा व मावशी कडून घेतली.तिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील,संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रयजी भारतीय,मुख्याध्यापक विजय डकरे शिक्षक चौबे,शुक्ला,ढेपे व सर्व शिक्षकवृंदाना देते.तिच्या या यशाबद्दल माजी जी.प.अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे,माजी नगराध्यक्ष अरूण वानखडे,जगदंब महाविद्यालय व विद्यालयाचे अध्यक्ष रमाकांत शेरकार,न.प.बांधकाम सभापती शोभाताई मुगल,अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा दल अध्यक्ष हरिश्चंद्र मुगल,राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद नैकेले,माजी विस्तार अधिकारी देवीदास घुलक्षे,सरमसपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अभिजित अहिरराव व असंख्य मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment