Friday, June 16, 2017
मंगरुळपीरच्या अमान ऊर्दु हायस्कुलची यशाची परंपरा कायम
Posted by vidarbha on 6:57:00 AM in | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन/ रिसोड/वाशिम -
मंगरुळपीर येथील अमान ऊर्दु हायस्कुलने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवत दहाविचा यंदा ९२.५०% निकाल लागला असुन तिन विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केच्या वर गुण मिळवून भरगोस यश संपादन केल्याने त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलींनी नव्वद टक्केच्या वर गुण घेवुन यश मिळविल्याने यशस्वी विद्यार्थ्याचे गुच्छ आणी पेढे देवुन कौतुक करन्यात आले.मंगरुळपीर येथील अमान ऊर्दु हायस्कुल मधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांचे शैक्षणीक मार्गदर्शन करुन यश मिळविन्यास मार्ग सुकर करुन दिला,तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शन आणी आईवडीलांचे प्रोत्साहन यांच्या बळावर आम्ही चांगले यश मिळवु शकलो अशा प्रतिक्रीया यशस्वी विद्यार्थ्यांनी दिल्या.शेख फिजा मोहम्मद अनवर या विद्यार्थीनीने ९३.२० % मिळवुन शाळेतुन पहिला येन्याचा मान मिळविला त्यापाठोपाठ कशफुस्सहर अब्दुल वहिद हिला ९२.६० %,आणी मिर सानिया या विद्यार्थीनीने ९१.४० % मिळवून विजयश्री खेचुन आनली.अमान ऊर्दु हायस्कुलच्या सर्व दहाविच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक म्हनून शाळेचे संस्थाध्यक्ष डाॅ.फिरोज खान आणी मूख्याध्यापक मिर्झा अन्वर बेग तथा शिक्षक व कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पूष्प आणी पेढे देवून कौतुक केले.यावेळी पालकांनी मुलांचे भरगोस यश बघुन समाधान व्यक्त केले.तर आईवडील आणी शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच यश मिळवू शकलो असे विद्यार्थ्यांनी सांगीतले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment