Sunday, June 4, 2017
चांदूर रेल्वे बस आगारात एसटी महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात पुष्पगूच्छे देऊन प्रवाशांचे जोरदार स्वागत
Posted by vidarbha on 1:29:00 PM in चांदूर रेल्वे /शहेजाद खान - | Comments : 0
चांदूर रेल्वे /शहेजाद खान -
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन संपूर्ण राज्यात साजरा
करण्यात आला.चांदूर रेल्वे बस स्थानक येथे वर्धापन दिनी प्रत्येक प्रवाशांना पुष्पगूच्छे देऊन
जोरदार स्वागत केले.
याप्रसंगी पत्रकार प्रा.रवींद्र मेंढे यांच्या हस्ते स्थानिक एसटी बस स्थानक येथे रिबीन कापून
वर्धापन दिन फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक सुरेश उईके,
वाहतुक निरीक्षक निलेश भगत, श्री.भालेराव, निलेश जगताप, विधी अधिकारी मोहोड
उपस्थित होते.राज्य महामंडळाचे सुत्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हाती घेताच
महाराष्ट्राची लोकवाहिनी एसटी परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अनेक
योजना राबविल्यात. त्याचाच एक भाग म्हणून १ जुन एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा
करणात आला. यावेळी प्रवाशांना विविध प्रकारच्या योजना व सवलतीची माहिती देण्यात
आली. तसेच प्रत्येक प्रवाशांना पुष्पगूच्छे देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी वाहतुक
नियंत्रक रामटेके, के.बी.सुलताने, एम.आर. वाडेकर, लेखापाल वैशाली डोळस, वाढोणकर,
प्रविण घाटे,श्री. सानप, प्रविण कहाळे, प्रमोद खवड यासह चालक व वाहक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment