*पावसाच्या सरी अन् भक्तीच्या लहरींमुळे वातावरणात रंग*
पुणे / पिंपरी -
तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज शुक्रवार (दि.१६) रोजी देहूतून प्रस्थान झाले आहे. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांमुळे देहू आणि आळंदी गर्दीने गजबजून गेली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमाला आज दुपारी अडीच वाजता प्रारंभ झाला विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी अतूर झाले आहेत. आता पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत.
राज्यात मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यामुळे वारकरी हर्षोल्हासात असून, ते यंदा आषाढी वारी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार देहू आणि आळंदीत भाविकांची गर्दी वाढली आहे. प्रत्येक ठिकाणी तुकोबांचा गजर चालू झाला आहे.
उद्या होणार माउलींच्या पालखीचे प्रस्थान
आळंदी संस्थान, नगरपालिका यांच्या वतीने पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून माउलींच्या पालखीचे उद्या शनिवार (दि.१७) जून रोजी प्रस्थान होणार आहे. मुख्य मंदिरात संस्थानच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे.
Post a Comment