शिवसूत्र मित्र परिवार तर्फे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
गजलगायक डॉ. उमाळे सन्मानित
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांचे सर्वोत्तम पुत्र रहाल, तेव्हा तुम्ही 21 व्या शतकातील शिवाजी महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवर करोडो रुपये खर्च केले तरी संस्कार विकत मिळत नाही. जगाच्या पाठीवर संस्कार करणारे स्वतःच्या पायावर पोरांना उभं करणार एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांच आहे. म्हणून तुमच्या मुलांना शिवचरित्र वाचायला द्या कारण शिवचरित्र वाचणारी मुलं आई बापाला वृद्धाश्रमात पाठवत नाहीत. असं मत युवा व्याख्याते सोपान कनेरकर यांनी शिवसूत्र मित्र परिवार आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगी केले.
शिवसूत्र मित्र परिवार आयोजित 'शिवराज्याभिषेक सोहळा व जाहीर व्याख्यान' प्रसंगी 'आजचा शिवबा' या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष प्रा.दिनेशजी सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष भाजपा), सत्कारमूर्ती डॉ.राजेशजी उमाळे, प्रमुख वक्ते सोपानजी कनेरकर (अध्यक्ष वीर सावरकर युथ वेलफेअर फाऊंडेशन), प्रमुख अतिथी प्रशांतजी देशपांडे (अध्यक्ष बार असोसीएशन), सुधीरजी बोपुलकर (अध्यक्ष हिंदू हुंकार संघटना), प्रमुख उपस्थिती नगरसेविका सुरेखाताई लुंगारे, नगरसेविका जाधव ताई, शिवसूत्र अध्यक्ष सर्वेशजी कनेरकर.
कनेरकर या वेळी म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात सर्व जातींचे मावळे होते. एकीकडे अमेरिका तीनशे वर्षांपूर्वीची दगड जमा करून देशाची स्मारक म्हणून जगाला दाखवत आहे. मात्र आमच्या देशातील गडकोट हि आमची खरीखुरी स्मारक असताना आम्ही मात्र त्याकडे दुर्लक्ष करतोय. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे, गडाच्या संवर्धनासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची सुद्धा ते म्हणाले. लोक म्हणतात शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण शिवाजी राजांना जन्म देणाऱ्या जीजाऊंचीच येथे उदरात हत्या होते , तेथे शिवाजी महाराज जन्मालाच येणार कसे ? असा प्रश्न उपस्थित करत युवा व्याख्याते सोपान कनेरकर यांनी समाजविघातक प्रवृत्तीवर सुद्धा घणाघाती हल्ला चढविला.
शहरातील विवीध युवकांनी एकत्र येऊन शिवसूत्र मित्र परिवाराच्या माध्यमातून संस्कार, संस्कृती, देव, देश,धर्म याचा वसा घेत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. त्यामुळे संपूर्ण स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसूत्रचे अध्यक्ष सर्वेश कनेरकर , संचालन तेजस काळबांडे व आभार प्रदर्शन रोहन तायडे यांनी केले.
शहरातील विवीध युवकांनी एकत्र येऊन शिवसूत्र मित्र परिवाराच्या माध्यमातून संस्कार, संस्कृती, देव, देश,धर्म याचा वसा घेत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. त्यामुळे संपूर्ण स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसूत्रचे अध्यक्ष सर्वेश कनेरकर , संचालन तेजस काळबांडे व आभार प्रदर्शन रोहन तायडे यांनी केले.
Post a Comment