मुंबई :-
*एसटी महामंडळाच्या वातानुकूलित "शिवशाही" बस सेवेला मुंबई-रत्नागिरी मार्गावर मिळालेल्या प्रवाशांच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर दि. १७.६.१७ (शनिवार) पासून पुणे-लातूर मार्गावर सदर बस सेवा सुरु करण्यात येत आहे.*
"शिवशाही" बस शिवाजीनगर (पुणे) येथून सकाळी ८.०० वाजता निघून इंदापूर - टेंभुर्णी-कुर्डुवाडी - बार्शी - एडशी - मुरुड मार्गे लातूरला दुपारी ४.०० वाजेपर्यंत पोहचेल तर लातूरहून रात्री ११.०० वाजता निघून बार्शी -इंदापूर मार्गे शिवाजीनगर येथे पहाटे ६.०० वाजता पोहचेल. या बसचे तिकीट भाडे प्रती प्रवासी (पुणे - लातूर) रुपये ५०१/- इतके ठेवण्यात आले आहे. तसेच सदर बस आगाऊ आरक्षणासाठी शनिवारपासून https://public.msrtcors.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून ss ४५ हा कोड (सांकेतांक) वापरून प्रवाशांना आपले ऑनलाईन आरक्षण करता येईल. तरी प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment