प्रवीण गोंगले / चंद्रपूर /--
सध्या चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हे ४५ डिग्री सेल्सियस च्या वर आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानाची नोंद योग्य पध्दतीने होत आहे की नाही याबाबतच जाणकारांनी शंका उपस्थित केली आहे. चंद्रपूर शहराच्या तुकूम परिसरात इंग्रजकालीन वेधशाळा आहे आणि या ठिकाणी असलेल्या यंत्रांच्या मदतीने तापमान, हवेचा दाब, आणि पर्जन्यमान मोजल्या जातं. मात्र या वेधशाळेच्या जागेवर पूर्णपणे अतिक्रमण झालं असून अचूक तापमान घेण्यासाठी जरुरी असलेल्या परिस्थिती नसल्याचा आक्षेप घेतल्या जात आहे. या पूर्णपरिसरात अतिक्रमण झाल्यामुळे झाडं-झुडपं वाढली आहे. आजूबाजूला मोठ्याला इमारती झाल्यामुळे तापमान मोजण्याच्या यंत्रात हवा जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या शिवाय आजू-बाजूच्या घरातून निघणा-या सांड पाण्यामुळे यंत्रात जाणारी हवा थंड होत आहे. या सर्व गोष्टींमुळे चंद्रपूर चे अचूक तापमान नोंदविल्या जात आहे की नाही या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालय. विशेष म्हणजे प्रशासनाला या बाबत वारंवार विनंती करून सुध्दा अतिक्रमण काढण्या बाबत काहीही करण्यात आलेलं नाही. कदाचित चंद्रपूरच्या तापमानाची अचूक नोंद झाल्यामुळे प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या अडचणी वाढणार असल्यामुळे या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय.

Post a Comment