BREAKING NEWS

Friday, May 20, 2016

आज शून्य सावली दिवस अर्थात झिरो शेडो डे

प्रवीण गोंगले /

चंद्रपूर -/   
 


 

  चंद्रपुरातील लोकांनी आज शून्य सावली दिवस अर्थात झिरो शेडो डे या खगोलीय घटनेचा अनुभव घेतला. विषुवतवृत्त आणि कर्क वृत्त यांच्या मध्ये १९ अंश आणि ५८ मिनिटांवर चंद्रपूर शहराची भौगोलिक स्थिती आहे आणि त्यामुळे १९ मे ला सूर्य अगदी चंद्रपूर च्या डोक्यावर असतो. त्यामुळे या दिवशी कुठल्याही गोष्टीची सावली ही अगदी सरळ पायात पडते आणि त्यामुळे सावली नसल्याचा आभास होतो. या खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी स्काय वॉच ग्रुप च्या वतीने लोकांना आवाहन करण्यात आले होते त्यानुसार लोकांनी १२ वाजुन ९ मिनिटांनी शून्य सावली दिवस अनुभवण्यासाठी जटपुरा गेट वर गर्दी केली. झिरो शेडो डे सोबतच आज चंद्रपुरात सूर्याला कडे असल्याचे सुध्दा दिसून आला. सूर्याच्या बाबतीत अशी घटना क्वचित घडते. कडक उन्ह आणि वातावरणात वाफ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सूर्या भोवती अशे कडे तयार होतात.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.