BREAKING NEWS

Friday, May 20, 2016

प्रवीण गोंगले /

चंद्रपूर -/





- पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरु असलेला इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम प्रशासन प्रभावीपणे राबवित असून या कामाची पाहणी करण्यासाठी 25 मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे चंद्रपूरला येणार आहेत. यावेळी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याची पूर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी आज इरई नदीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, कार्यकारी अभियंता ईशवर आत्राम व अधिकारी हजर होते.

कारखान्याची राख व ओव्हर बर्डनमुळे लुप्त पावलेली इरई नव्याने पूर्नजन्म घेत आहे.   प्रसिध्द जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंग यांनी 8 मे रोजी नदीची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. आज पडोली, दाताळा व चौराळा या ठिकाणी प्रशासनाने सुरु केलेल्या इरई पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी  केली. दूर्गापूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील राख व ओव्हर बर्डनमुळे इरईचा मुळ प्रवाह बदलला होता. यामुळे इरईचे मुळ रुप नष्ट होण्याच्या मार्गावर असतांना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन  इरई पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे. आज जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून महत्वाच्या सूचना केल्या. त्याच प्रमाणे नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रगती जाणून घेतली.

25 मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे इरई पुनरुज्जीवन कार्यक्राची पाहणी करण्यासाठी चंद्रपूरला येणार आहेत. या पाहणी दौऱ्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून आढावा घेतला. या विषयी 25 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.