BREAKING NEWS

Thursday, May 19, 2016

बरड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - येत्या १० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

अनिल चौधरी,
पुणे :-


      मराठी सिनेसृष्टीत बरेच प्रयोग होताना आपल्याला दिसत आहेत. वैविध्यपूर्ण विषयांवर सिने निर्माते सिनेमा बनवण्याचे धाडस करत आहेत. इमेज एसआरके प्रोडक्शन्स ‘बरड’ या चित्रपटाच्या निमित्ताने असाच एक ज्वलंत विषय घेऊन येत आहे.

बरड हा सिनेमा येत्या १० जूनला प्रदर्शित होत आहे. बरड म्हणजे माळरान, खडकाळ, नापिक जमीन...बागायती जमीन शेतकऱ्यांचे सर्वस्व असते तर नापिक जमीनीचा वापर केवळ गुरे चरवण्यासाठी होतो. तर अशा ह्या बरडीवर सरकारी संस्थेची थोडीशी हालचाल होते आणि एका रात्रीत फासे पलटतात. बरडीला प्रचंड महत्त्व येते. संभाव्य मिळणाऱ्या मुबलक पैशावर मोठमोटी स्वप्ने पाहिली जातात. अचानक मिळणाऱ्या पैशामुळे नाती पणाला लागतात. अचानक आलेली श्रीमंती माणसाला कशी बिघडवते, एक अफवा संपूर्ण गावाला विनाशाच्या उंबरठ्यावर कशी आणून ठेवते. यासगळ्या परिस्थितीचे उत्तम चित्रण म्हणजे ‘बरड’...

अथर्व मुवीज प्रस्तुत, देवेंद्र कापडणीस निर्मित आणि कुमार गांधी सहनिर्मित बरड या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी महादेव घाडगे यांनी केले आहे. तर कमल चौपाल आणि सुरेंद्र सिंग ह्यांनी या सिनेमाचे छायाचित्रन केले आहे. रोहन – रोहन, संदीप वाडेकर ह्यांनी ह्या सिनेमाला संगीत दिले असून, पार्श्वसंगीत प्रकाश नर यांनी केले आहे. डॉक्टर मिथिला कापडणीस यांनी गीत लिहिले आहे. सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, शहाजी काळे, राजन पाटील, संजय कुलकर्णी, किशोर चौगुले, धनंजय जामदार असे बरेच कलाकर असलेला हा सिनेमा येत्या १० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.