BREAKING NEWS

Thursday, May 26, 2016

नेल्सन मंडेलांना भारतरत्न; मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना का नाही ? अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांचा खणखणीत प्रश्‍न

  पुणे,/-  - दक्षिण आफ्रिकेत वंशविरोधी लढा देणारे नेेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार मिळतो; परंतु स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हा पुरस्कार का दिला जात नाही, असा खणखणीत प्रश्‍न शिवसेना उपनेते, अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. शिवसेना कोथरूड मतदारसंघाच्या बाणेर विभागाच्या वतीने शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्ण पुण्यतिथी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वाहा या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण, शहर संघटक श्याम देशपांडे, कार्यक्रमाचे संयोजक गणेश कळमकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.