संभाजीनगर, / -
तमिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच पहिल्या दिवशी मद्यविक्रीची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मद्यबंदीला कधी प्रारंभ कधी होणार, असा प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रानेही पुढील ३ वर्षांत क्रमश: मद्यबंदी लागू करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
ते पुढे म्हणाले की, प्रथम बिहारमध्ये आणि नंतर तमिळनाडूमध्ये मद्यबंदी झाली. आता महाराष्ट्रात कधी हा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. तमिळनाडूत मद्याचा वापर आणि त्यापासून राज्य शासनाला मिळणारा कर महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे. प्रत्येक राज्य शासनाने मद्याच्या करावर पाणी सोडणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनानेही या रक्तलांच्छित कराचा लोभ सोडावा. राज्यातील नागरिकांना पाणी हवे असून मद्य नको आहे.
तमिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच पहिल्या दिवशी मद्यविक्रीची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मद्यबंदीला कधी प्रारंभ कधी होणार, असा प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रानेही पुढील ३ वर्षांत क्रमश: मद्यबंदी लागू करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.ते पुढे म्हणाले की, प्रथम बिहारमध्ये आणि नंतर तमिळनाडूमध्ये मद्यबंदी झाली. आता महाराष्ट्रात कधी हा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. तमिळनाडूत मद्याचा वापर आणि त्यापासून राज्य शासनाला मिळणारा कर महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे. प्रत्येक राज्य शासनाने मद्याच्या करावर पाणी सोडणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनानेही या रक्तलांच्छित कराचा लोभ सोडावा. राज्यातील नागरिकांना पाणी हवे असून मद्य नको आहे.
Post a Comment