मुंबई - जावयाच्या लिमोझिनवरून आरोप करणार्या अंजली दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला आहे. अंजली दमानियांनी पैसे घेऊन माझ्यावर आणि माझ्या जावयावर आरोप लावले असल्याचे खडसे म्हणाले. दमानियांनी लावलेले आरोप सिद्ध झाले तर मी महाराष्ट्राची माफी मागेल, असेही खडसे म्हणाले.
एवढेच नव्हे तर दमानियांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोपही खडसेंनी केला. दरम्यान, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनी आरटीओचे नियम पायदळी तुडवून सोनाटा कार लिमोझिनमध्ये मॉडिफाईड केल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. तसेच खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार लवकरात लवकर जप्त करण्याची मागणी देखील दमानियांनी केली आहे.

Post a Comment