BREAKING NEWS

Friday, May 20, 2016

जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सुरेशराव महल्ले यांची आत्महत्या

मंगेश भुजबळ / धामणगाव रेल्वे /--


आजाराच्या त्रासाला कंटाळून जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री सुरेशराव महल्ले यांनी आज गुरुवारी सकाळी रेल्वे खाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली.
सुरेशराव गजाननराव महल्ले (६७) यांनी गुरुवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास येथील गौरक्षण जवळील अप साईडचे रेल्वे ट्रकवर स्वत:ला झोकून देऊन मालगाडीच्या जबर धक्क्याने जीवनयात्रा संपविली. मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात मागील काही वर्षाच्या आजाराला कंटाळून व उपचार करूनही काही उपयोग होत असल्याने हा टोकाचा निर्णय घेत असून तेरवीचा अनाठाई खर्च न करता कुटुंबियांनी स्थानिक गजानन महाराज मंदिराला ११ हजारांची देणगी देण्याची अंतिम इच्छा पत्राच्या शेवटी त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे पश्‍चात पत्नी सुलोचनाबाई, मुले सचिन, स्वप्नील व सरील तसेच दोन भाऊ, बहीण असा आप्त परिवार असून रात्री अत्यंसंस्कार करण्यात आले.



<><>असे होते सुरेशराव महल्ले <><> 


 
मुळचे जवळच्या दिब्धी महल्ले येथील शेतकरी कुटुंबातील सुरेश महल्ले यांना राजकीय वारसा असल्यामुळे सेवानवृत्तीपर्यंत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शाखा अधिकारीपदी कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन याची अ.म.जि. सह बँकेचे संचालकपदाची धुरा सांभाळली. संचालकपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यासोबतच आपल्या तालुक्यातील बँक शाखेतही शेतकर्‍यांच्या हितासाठी कर्ज पुनर्गठन, पेरणी पूर्वी मिळणारे पीककर्ज उपलब्ध करून देणे, बँकेत शेतकर्‍यांना सन्मानाच वागणूक मिळणे हे त्यांचा कार्यशैलीचे वैशिष्ट होते. अकस्मात त्यांना काळाने हेरावून नेल्याने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक तसेच ग्रामीण शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.