BREAKING NEWS

Friday, May 20, 2016

पोलिसांनी केला उपोषणकर्त्या शिक्षकाचा मंडप उद्ध्वस्त, पत्नी, मुलगी आणि मुलाला केले जबरदस्ती रुग्णालयात दाखल

अमरावती / सुरज देवहाते /--


आपल्या विविध मागण्या घेऊन मागील  २५ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला रुग्णालयात दाखल करून उपोषण मंडप हटवून पोलिसांनी जप्तीची कारवाई गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केली. यां आधीही पोलिसांनी या प्रकारचे कृत्य केले होते ते रात्री ११ वाजता त्या वेळेस जबरदस्ती पत्नी  मुलगी व मुलाला व स्वत मदन शेळके यांना इर्विन ला भरती करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.  दरम्यान त्यांच्या कुटुंबाने देखील साखळी उपोषण सुरू केले होते. शेळके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. साखळी उपोषण असल्यामुळे त्यांची मुलगी आणि एक नातेवाईकच मंडपात होते.
हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार १७ ते २२ दरम्यान वातावरण चांगलेच तापणार असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तापते ऊन आणि वातावरणाचा दाखला देत कार्यतप्तरता दाखवित पोलिसांनी शेळके यांची पत्नी, मुलगी, मुलगा आणि एका नातेवाईकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून स्वत: मंडप खोलून सर्व साहित्यासानिशी पोलीस ठाण्यात नेला. यावेळी शेळके परिवाराने विरोध केल्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलीस निरीक्षक श्री पुंडकर, पोलीस उपनिरीक्षक वैशाली चव्हाण यांच्या नेतृत्वात सदर कारवाई करण्यात आली.

<><> पोलिसांनी कार्यतप्तरता त्यांचा मागण्या पूर्ण होण्याचा  बाबतीत दाखवला असता तर जास्त आनंद झाला असता , जर मदन शेळके यांनीच भ्रष्टाचार केला असेल तर सरकार त्यांचा वर गुन्हा का दाखल करीत नाही ? का उपोषण करून त्यांना टांगणीला लाऊन ठेवण्यात आले आहे हे कळायला मार्ग अजून तरी दिसत नाहीये <><>

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.