BREAKING NEWS

Friday, May 20, 2016

प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात आणि त्या पाळल्याच गेल्या पाहिजेत ! महिलांच्या मंदिर प्रवेशावर कांची कामकोटीचे पीठाधीश्‍वर शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे मत

चेन्नई -



कांचीपुरम् येथील कांची कामकोटी पीठाधीश्‍वर शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांची नुकतीच रेडिफ डॉट कॉम या वृत्तसंकेतस्थळावर मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर मत प्रदर्शन केले आहे. या मुलाखतीचे काही संक्षिप्त अंश पुढे देत आहोत.
<><> महिलांचा मंदिर प्रवेश <><>
    महिलांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्‍न घेऊन न्यायालयात खटले चालू आहेत, हे अयोग्य आहे. मंदिराच्या गर्भगृहात कुणालाच प्रवेश नको. मग त्यात महिला आणि पुरुषही आले. महिलांना मंदिराच्या बाहेर ठेवणे ही हिंदु धर्मात परंपरा नाही; मात्र प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात आणि त्या पाळल्याच गेल्या पाहिजेत.
<><> पंतप्रधान नरेंद्र मोदी <><>
     मोदी एक चांगले गृहस्थ आहेत. त्यांनी माझ्यासोबत गुजरात राज्यात वर्षभर पदयात्रा केली आहे. त्यांच्या राजवटीवर टीका करणार्‍यांची तशी इच्छा आहे म्हणून ते करतात; मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडून काहीच अपेक्षा पूर्ण होणार नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. शासन योग्य मार्गावर आहे. असे शासन भारताला परत लाभणार नाही.
<><>राममंदिर निर्माण <><>
    मी आधीही राम मंदिर उभारण्याच्या मोहिमेत सहभागी होतो आणि आजही आहे. नरेंद्र मोदी पडद्यामागून हालचाली करत आहेत; मात्र आम्ही या प्रकरणी पुढाकार घेणे चालूच ठेवले पाहिजे.
स्वत:वरील खटले
      श्रीमती जयललिता सरकारने माझ्यावर २ खटले भरले होते. खून खटल्यातून मी मुक्त झालो. दुसर्‍या खटल्यात काय होईल ते ईश्‍वरच जाणे ! मात्र मला श्रीमती जयललिता यांच्याविषयी ना राग आहे ना द्वेष आहे.v

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.