BREAKING NEWS

Saturday, June 11, 2016

प्रभाग क्र 4 ची नगरसेवक श्री नितीन गवळी यांनी केली पाहणी - नागरिकांचा समस्या घेतल्या जाणून, समस्या लवकरच सोडविण्याची दिली शाश्वती



चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--- \



 

स्थानिक नगरपरिषद मधील मुख्याधिकारी ठाकरे यांचा दुर्लक्ष पणामुळे शहरात समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच प्रभाग क्रमांक 4 ची नगरसेवक श्री नितीन भाऊ गवळी यांनी पाहणी करून नागरिकांचा समस्या जाणून घेतल्या व समस्या लवकरात लवकर सोडविण्याची शाश्वती दिली. त्यामुळे प्रत्यक्ष प्रभागाची पाहणी करून सर्वसामान्य जनतेचा  समस्या जाणून घेणारे श्री नितीन गवळी हे शहरातील एकमात्र नगरसेवक असल्याचे समजून आले आहे.

नगरसेवक श्री नितीन गवळी हे सतत प्रभागात भेटी देऊन नागरिकांचा समस्या नेहमीच तत्परतेने जाणून घेतात , नुकतेच त्यांनी प्रभाग 4 मध्ये जाऊन पाहणी केली व नागरीकांचा समस्या जाणून घेतल्या .  4 ते 5 दिवस सतत स्ट्रीट लाईट बंद राहणे,   विहिरी उपसायला आल्या मात्र उपसल्या नाही , नळ सुरळीत येत नाही ,   अश्या इतरही समस्या या भेटी दरम्यान त्यांचा कानावर आल्या .    नितीन गवळी यांनी तेथील स्थानिक नागरिकांन सोबत चर्चा करताना नागरिकांना सांगितले कि सदर समस्यांविषयी मुख्याधिकारी यांना तोंडी व निवेदन  सुधा दिले  मात्र अद्यापही  त्यांनी दाखल घेतली नाही  मात्र तरीही मी प्रयत्नशील आहेच असेही नितीन गवळी यांनी सांगितले , याच समस्यांविषयी  मुख्याधिकारी यांना पुन्हा भेटणार असून लवकरच त्यांनी दाखल घेतली नाही तर जन आंदोलन शिवाय पर्याय उरणार नाही असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. पावसाला सुरु होताना दिसत असून अद्यापही नाल्यांची सफाई झालेली नाही. त्यामुळे प्रभाग 4 चा अनेक वाढत्या समस्येकडे मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून नगरसेवक श्री नितीन गवळी हेच सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे  . मागील आठवड्यात रात्री विद्युत खांबावरील शॉट सर्किट मुळे प्रभागातील काही भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता  सदर माहिती नितीन गवळी यांना समजताच त्यांनी स्वतः रात्रीचा वेळी संबंधित विभागाशी संपर्क करून  विद्युत पुरवठा सुरु करून घेतला  त्यामुळे त्यांचे आभार स्थानिक नागरिकांनी त्यांचा प्रभाग भेटीचा दरम्यान मानले हे विशेष.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.