BREAKING NEWS

Saturday, June 11, 2016

हेल्पिंग हॅण्ड्स ने उचलला मुजाहिद च्या प्रवेशाचा खर्च


अहेरी / रंगय्या रेपाकवार /--- 

      अहेरी जवळील चिंचगुंडी येथील युवक मुजाहीद सैय्यद च्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी हेल्पिंग हॅण्ड्स सामाजिक सेवा संस्था अहेरी तर्फे आर्थिक मदत करण्यात आली. वेळोवेळी अहेरीकरांनी तथा विविध माध्यमातून आपण जी आर्थिक मदत आम्हाला करीत असता त्याच मदतीतुन हां खर्च उचलण्यात आला.
  #मुजाहीद सैय्यद याची आर्थिक परिस्थिति अत्यंत हलखीचि आहे. त्याचे वडील अहेरीत टेलरकाम करतात. मुजाहीद सैय्यद याला इयत्ता १२ वि मधे ८५ टक्के गुण मिळाले होते. तो सध्या तो पुणे येथिल नौरोजी वाडिया महाविद्यालय मधे बीए इकोनॉमिक्स होनर्स मधे प्रथम वर्षात शिकत आहे. द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी त्याला ७५००/- ची गरज होती मात्र त्याला आर्थिक अडचण भासत होती ही बाब हेल्पिंग हॅण्ड्स च्या कार्यकर्त्यांना माहीत झाली व मुजाहीद ला प्रवेशासाठी ७६१०/- रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
    #सध्या रमजान चा पवित्र महीना सुरु असून एका मुस्लिम युवकास शिक्षणासाठी मदत केल्यानी अहेरिकरांनी सामाजिक बांधीलकीचा सन्देश दिला. आम्ही केलेली मदत ही अत्यल्प आहे मात्र फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केलि. आपणही मुजाहिद ला मदत करु शकता..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.