BREAKING NEWS

Friday, June 3, 2016

कुलरमुळे शॉक लागून तिघांचा मृत्यू

नागपूर /---


कुलरमध्ये पाणी घालत असताना विजेच्या धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला. एकामेकाला वाचविण्याच्या धावपळीत तिघेही जागीच बेशुद्ध झाले. श्री किशोर शंकर दामले (६१), पत्नी अंजली दामले (५५) व मुलगी विनीशा काळे (३३) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही विदर्भ प्रिमिअर सोसायटी, झिंगाबाई टाकळी येथे राहतात. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
किशोर दामले सेवानवृत्त एएसआय आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा शिक्षक आहे. घटनेच्या वेळी तो शाळेत गेला होता. तर सून बाहेर होती. २0१३ मध्ये त्यांची मुलगी विनिशा यांचे कमलेश काळे यांच्यासोबत लग्न झाले. कमलेश हे एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक आहेत. विनिशा या याच इमारतीत पहिल्या माळ्यावर राहातात. त्यांना १८ महिन्यांचा मुलगा निमिश आहे. निमिश हा दुपारी दामले यांच्याकडे जात होता. विनिशाही वडिलांकडे गेली. दुपारी विनिशा आईकडे गेली. कुलरमधील पाणी संपल्याने विनीशा पाणी घालण्यासाठी गेली. त्यातच त्यांचा तोल जाऊन त्या कुलरसह खाली पडल्या. कुलरचे पातेही तुटले.विजेच्या धक्क्याने विनीशा बेशुद्ध झाली. तिला वाचविण्यासाठी वडील किशोर आणि आई अंजली धावली. त्यांनाही विजेचा धक्का लागला. तिघेही बेशुद्ध पडले होते. आवाजामुळे शेजारी धावून आले. तिघेही बेशुद्ध असल्याचे पाहून लोकांनी आरडाओरड केली. काही वेळातच मानकापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चौधरी सहकार्‍यांसह घटनास्थळी गेले. तिघांनाही मेयो रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले


Nagpur News , Amravati News , Vidarbha News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.