गडचिरोली / रंगया रेपाकवार /---
पोलिस खबर्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी आज गुरुवारी एका युवकाची गोळय़ा घालून हत्या केली. शरद चुकू कुरसामी (३0) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस हद्दीत येणार्या र्मदमलिंगा गावातील रहीवासीआहे. नक्षल्यांनी शरद कुरसामी यांचे तीन दिवसांपूर्वी अपहरण केले होते. त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अभियान राबविले, परंतु त्याचा थांगपत्ता लागला नाही. काल बुधवारी रात्री नक्षल्यांनी शरद कुरसामी याची हुक्कामेटा गावाजवळ गोळय़ा झाडून हत्या केली. करसामी पोलीस खबर्या नव्हता, तो गावात राहून शेती करीत होता. नक्षल्यांना वारंवार येणार्या अपयशामुळे ते खचले असून भ्याड कृत्य करीत आहेत. नक्षलवादी चळवळीचा जनतेने धिक्कार करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
Nagpur News , Amravati News , Vidarbha News, Maharashtra News
Post a Comment