कोल्हापूर -/-
- कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्चिती करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयात यावर २३ जून या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे, त्यामुळे कोल्हापूर येथील सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांना केली. ही विनंती न्यायाधिशांनी मान्य करत कोल्हापूर येथील पुढील सुनावणी २४ जून या दिवशी होईल, असे सांगितले. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. विशेष शासकीय अधिवक्ता हर्षद निंबाळकर हेही सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांनी उच्च न्यायालयाचा स्थगितीचा आदेश न्यायालयात सादर केला. श्री. समीर गायकवाड यांच्या बाजूने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी बाजू मांडली. श्री. समीर गायकवाड पोलीस बंदोबस्तात न्यायालयात उपस्थित होते.v

Post a Comment