भामरागड / रंगाय्या रेपाकवार /--
9 जून 2016 ला मौजा भामरागड येथे बिरसा मुंडा यांचे 116 व्या बलिदान दिनाचे औचित्य साधून बिरसा मुंडा चौक भामरागड येथे बिरसाजीला श्रद्धांजली वाहून गोंडी पुनेम सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. मुलवंश गोंडांच्या जल जमीन जंगल यांवरील अधिकार संपलेला होता. तो पुन्हा मिळविण्यासाठी, इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वत :च्या प्राणांची आहुती देणारे या गोंडवाना भूमिचे क्रांतीपुरूष बिरसा मुंडा होत. बिरसाने देशासाठी महान कार्य केले. त्यांच्या या महान कार्याची नंदादीप भारतीय ईतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदली गेली. अशा महान क्रांतीवीराला भामरागड येथे त्यांच्या 116 व्या बलिदान दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व नंतर बिरसा मुंडा चौकात कोया पुनेम सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भामरागड येथील गोंडवाना समाजाचे साथी दादारावन कुसराम, वसंत इष्टाम, बिच्चू वड्डे, दिनेश मडावी, नरेश मडावी, लालसू धुर्वे, बंगारू गावडे, काशीनाथ आत्राम, अनवरशाह मडावी, विजय सडमेक, उपेंद्र सडमेक, सुरेश पदा, रमाबाई, शिलाताई, गीताताई , विनीता, सपनाताई, राखी कुलमेथे, पुष्पा कुलमेथे, शांताबाई मडावी, चंदा वड्डे, भारती इष्टाम.... उपस्थित होते.

Post a Comment