BREAKING NEWS

Friday, June 10, 2016

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

मुंबई :- महाराष्ट्र  राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत  आज जाहीर झाली आहे.
राज्यातील एकूण 26 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत.
जिल्ह्यावर नियंत्रण कोणत्या पक्षाचं आणि अध्यक्षपदी कोण, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. अखेर आज ही सोडत जाहीर झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या सामाजिक घटकासाठी आहे हे पाहून राजकीय पक्ष आपले डावपेच आखतात.
पहा आरक्षण /--
अनुसूचित जाती – भंडारा, अमरावती,
*अनुसूचित जाती महिला राखीव — हिंगोली, नागपूर
*अनुसूचित जमाती महिला — नंदुरबार, ठाणे, गोंदिया,
*अनुसूचित जमाती – वर्धा, पालघर
*नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओबीसी ) — अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे
*नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ओबीसी ) — जळगांव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ
*सर्वसाधारण प्रवर्ग महिला – सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशिम,
*सर्वसाधारण प्रवर्ग — जालना, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली
यापैकी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम यांची आरक्षणे या जूनपासून लागू होतील. पालघरचे जुलै 2017 पासून, तर भंडारा, गोंदियाचे डिसेंबर 2017 पासून लागू होणार आहे. इतर जिल्ह्यांचे 2017 मार्च निवडणूक झाल्यानंतर होईल.
Vidarbha24news.com

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.