BREAKING NEWS

Friday, June 10, 2016

मंगलमूर्ती फिल्म्स चा दुसरा जीवनपट ‘एक अलबेला’ येत्या 24 जूनला होणार प्रदर्शित...

 अनिल चौधरी,/
पुणे :-/    




 
बऱ्याच यशस्वी हिंदी चित्रपटांचे यश गाठीला घेऊन दगडी चाळ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मंगलमूर्ती फिल्म्स ही चित्रसंस्था आता अजून एक जीवनपट घेऊन येत आहे. भगवान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांचा जीवनपट मंगलमूर्ती फिल्म्स प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित ‘एक अलबेला’...
शोला जो भडके दिल मेरा धडके...दर्द जवानी का सताये बढबढके... म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर चित्रपट येऊ घातला आहे. गेले कित्येक दिवस हा चित्रपट विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा सिनेसृष्टीत सुरू आहे. या चित्रपटाचा अजून एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन... हिंदी सिनेसृष्टीतील उल्लाला गर्ल...विद्या बालन यात गीता बालीच्या भूमिकेत दिसणार आहे.
शेखर सरतांडेल यांच्या दिग्दर्शनाने सजलेला असा ‘एक अलबेला’ हा जीवनपट येत्या 24 जून ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.