पुणे -

आज भारतीय संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांची मृत्यूघंटा वाजू लागली आहे. भारतीय स्त्री नट्टापट्टा (फॅशन) आणि करियरं यांच्या मागे धावतांना धर्माचरण आणि संस्कार विसरल्याने ही स्थिती ओढावली आहे. जुळवून घेण्याच्या वृत्तीचा अभाव, शिक्षणामुळे निर्माण झालेला अहंकार आदी गोष्टींमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी नाती जपा आणि निभावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. मुक्ता महिला मंचच्या वतीने ५ जून या दिवशी येथील परिणय मंगल कार्यालयात नाती जपा या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी कुटुंबव्यवस्था टिकवण्याच्या तळीमळीतून केलेले व्याख्यान उपस्थित महिलांच्या अंतराचा वेध घेणारे ठरले.

अधिवक्त्या रामतीर्थकर यांनी सांगितलेली महत्त्वाची सूत्रे !
* भारतीय स्त्रीचे दिसणे नाही, तर असणे महत्त्वाचे आहे.
* आज देश आणि संस्कार संकटात असतांना आपण दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका पहाण्यात आपण २-३ घंटे घालवत आहोत, याचा विचार करायला हवा.
* महिलांनी पुरुषार्थ गाजवायचा असतो; पण पुरुष होण्याच्या भानगडीत पडायचे नसते.
* मुलींना धर्मशिक्षण द्यायला हवे. कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होते.
Post a Comment