कल्याण येथील पत्रकाराच्या घरावर आक्रमण करणारे आरोपी मोकाट !
Posted by
vidarbha
on
7:41:00 AM
in
|
कल्याण
/---
भिवंडीतील कोनगाव येथे अनधिकृतरित्या सुरू असलेल्या बांधकामाविरोधात बातमी
प्रसिद्ध केली म्हणून तेथील चवताळलेल्या भूमाफीयांनी ‘इनाडू इंडिया’ या
न्यूज पोर्टलचे पत्रकार सिद्धार्थ कांबळे यांना त्याच्या घरात शिरून
शिवीगाळ व धक्काबुक्की केली असून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा
धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.. २ दिवसांपूर्वी रात्री १०.१५ च्या सुमारास
हातात धारदार शस्त्रे घेवून नूर निशा खलील, तीचा नवरा खलील शेख, भाऊ अश्पाक
आणि जाकिर या सर्वानी मिळून सिद्धार्थ कांबळे यांच्या घरात घुसून त्यांना
आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण अजूनपर्यंत आरोपींना
अटक करण्यात आली नाही.
Post a Comment