BREAKING NEWS

Wednesday, June 8, 2016

पुरुष राष्ट्राचे संरक्षण करत असतील, तर महिलांनी मुलींचे संरक्षण करायला हवे ! - सौ. अनुपमा रेड्डी, सामाजिक कार्यकर्त्या

बेंगळुरू -
 


आज पालक त्यांच्या मुलांना योग्य पोशाखाविषयी सांगत नाहीत. आज धर्माविषयी अभिमान नसल्याने आपल्या मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे आपल्या धर्मातील सर्व मुलींचे संरक्षण होण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. पुरुष राष्ट्राचे संरक्षण करत असतील, तर महिलांनी मुलींचे संरक्षण करायला हवे, असे प्रतिपादन बेंगळुरू येथील अनुबंध न्यासाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनुपमा शेट्टी यांनी केले. स्त्रियांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेचे आदीचुंचनगरी, समुदायभवन, विजयानगर येथे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद, रणरागिणी शाखेच्या समन्वयक कु. भव्या गौडा आणि मैसूर, हासन आणि तुमकूर येथील रणरागिणी शाखेच्या समन्वयक सौ. सुमा मंजेश यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.